प्राचार्य डॉ 

प्राचार्य डॉ. दिगंबर मोरे यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार जाहीर

हिंगोली – आखाडा बाळापूर येथील नारायणराव वाघमारे महाविद्यालयाचे प्राचार्य दिगंबर रामराव मोरे यांना आदर्श राज्य पुरस्कार जाहीर झाल्याचे एआएसएफ वैद्यकीय समिती महाराष्ट्र पुरस्कार निवड समितीचे राज्याध्यक्ष डॉ. अमोल जाधव यांनी २०२२ चा पुरस्कार जाहीर केला आहे.

प्राचार्य डॉ. दिगंबर मोरे यांनी या यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील लाल बहादूर  शास्त्री महाविद्यालयात प्राचार्य म्हणून  १६ वर्ष उत्कृष्ट कामगिरी करून नावीन्य पूर्ण उपक्रम राबविले होते. या सुत्य उपक्रमाची नांदेड एसआरटी विद्यापीठाने दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले होते. डॉ. मोरे यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली असल्याने त्यांच्या कामाची वैद्यकीय समितीने दखल घेत त्यांना  आदर्श प्राचार्य महाराष्ट्र राज्य २०२२ हा पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा १४ ऑगस्ट रोजी खुलताबाद ,संभाजीनगर औरंगाबाद येथे होणार आहे. प्राचार्य डॉ. दिगंबर मोरे यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे आदरणिय अध्यक्ष डॉ कृष्णराव पाटील जरोडेकर साहेब व संस्थेचे सचिव व सर्व संचालक, सदस्यांकडून आणि मित्र मंडळीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.